सहगल यांच्या भाषणाचे जाहीर वाचन: सखोल चौकशी होऊन पडद्यामागील सूत्रधार शोधण्याची मागणी

0

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण मागे घेणे हा निंदनीय प्रकार
सहगल यांच्या भाषणाचे जाहीर वाचन
मुरगूड प्रतिनिधी:
यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या उदघाटक म्हणून निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याची संयोजकांची कृती अतिशय निषेधार्ह आहे.हा प्रकार म्हणजे अलीकडे वारंवार होत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील नवा हल्ला आहे.तसेच मराठी भाषा, साहित्य,संस्कृती व माणूस यांचाही अपमान आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पडद्यामागील सूत्रधार शोधण्याची गरज आहे.कारण नयनतारा सहगल यांचे लिखित भाषण आल्यावर हे षडयंत्र रचले गेले आहे.म्हणूनच या भाषणाचे जाहीर वाचन करून त्याला पाठींबा व्यक्त करत व निमंत्रण परत घेणाऱ्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत असे मत इचलकरंजीतील समता संघर्ष समिती, साहित्य व पुरोगामी संस्थांच्या समाजवादी प्रबोधिनीमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत व्यक्त करण्यात आले.
प्रारंभी मराठीचे पहिले ज्ञानपीठ विजेते थोर साहित्यिक कालवश वि.स. खांडेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.धोंडिबा कुंभार यांनी प्रास्ताविकातून या बैठकीमागील भूमिका स्पष्ट केलीे.प्रसाद कुलकर्णी यांनी नयनतारा सहगल यांचे भाषण वाचले.नंतर त्यावर अनेक अंगांनी चर्चा झाली.आणि या भाषणातील आशयाशी सहमती दर्शवली गेली.यावेळी बजरंग लोणारी,श्रीकांत फाटक,अजित मिणेकर, दयानंद लिपारे,प्रा.रमेश लवटे,बाबासाहेब नदाफ,शिवाजी साळुंखे,बसय्या स्वामी,रंगराव बोंद्रे, सर्जेराव जाधव,रमेश लोहार,शंकरराव भाम्बिष्टे,रियाज जमादार,मुबारक शेख,सिद्राम अतिगीडद,संदीप कदम सदा मलाबादे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here