मौजे ठाणेवाडी येथे प्रकाश झोतात प्रोकब्बडी

0

मौजे ठाणेवाडी येथे प्रकाश झोतात
प्रोकब्बडी
मुरगुड प्रतिनिधी
मौजे ठाणेवाडी ता.कागल येथे भावेश्वरी यात्रेनिमित्त भावेश्वरी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने दिनांक 23 ते 25 फेब्रुवारी अखेर 55 किलो वजनी गटातील प्रकाश झोतात प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे चषक व 7777, 5555 व 3333 रुपयांचे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट पकड, खेळाडू आणि चढाईसाठी प्रत्येकी 1001 रु चे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 501 रु आहे. स्पर्धा निर्धारित तारखेस सायं 5 वा सुरु  होतील. सामने भावेश्वरी दूध संस्थेच्या आवारात होणार आहेत.प्रवेशासाठी विनायक तोरसे,सात्तापा हजारे,भरत घोटणे,प्रवीण सावंत,अभी गोते,अमर हासुरकर,अभी यमगेकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्पर्धा कमिटीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here