पृथ्वीराज चौगले यांची युवा मोर्चा कार्यकरणी सदस्यपदी निवड

0

कोल्हापूर: (सागर के ) भारतीय जनता युवा मोर्चा,जिल्हा(ग्रामीण)कार्यकरणी सदस्यपदी पृथ्वीराज चौगले यांची निवड करण्यात आली. चौगले हे माधळे ता. करवीर गावचे आहेत. त्यांना  सामाजिक कार्य करण्याची आवड आहे.ते महाविद्यालयात असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे   आदर्श विभाग स्वयसेवक म्हणून गौरवले होते. त्याच बरोबर ते उच्च शिक्षित असल्यामुळे ते तरुणाई समोर प्रेरणात्मक कार्य करत असतात. याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. भाजप चे संघटन मंत्री बाबा देसाई यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र दिले.  जिल्हा अध्यक्ष अजय चौगले व जि.प. माजी सदस्य व सभापती के. ए स.चौगले,आदी चे मार्गदर्शन लाभले. तरी पृथ्वीराज चौगलेंच्या निवडी मुळे त्याचावर परिसरातून अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here