देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद…

रामनाथ कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती...

0

रामनाथ कोविंद हेच देशाचे राष्ट्रपती होणार हे काळ्या दगडावरील रेष होती आणि ते आता सत्यात उतरले आहे. देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेणार आहेत. आज संसदेमध्ये राष्ट्रपतीपदाची मतमोजणी झाली. रामनाथ कोविंद यांना 65.35 टक्के तर यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना 34.35 टक्के इतकी मते मिळाली. रामनाथ कोविंद यांच्यारुपानं देशाला दुसरा दलित राष्ट्रपती मिळाला आहे. के.आर.नारायणन हे देशाचे पहिले दलित राष्ट्रपती होते. रामनाथ कोविंद यांना 66 टक्के म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34 टक्के म्हणजेच 3 लाख 67 हजार 314 मतं मिळाली.त्यामुळे आता रामनाथ कोविंद हे येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मी गरीब जनतेचा प्रतिनिधी आहे, देशाची सेवा अविरतपणे करत राहणार, अशी प्रतिक्रिया रामनाथ कोविंद यांनी दिली. तर रामनाथ कोविंद यांच्या निवडीने भाजपचा देशभरात जल्लोष सुरु आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकमध्ये यूपीएकडून उमेदवारी लढवलेल्या मीरा कुमार यांनी पराभवानंतर रामनाथ कोविंद यांचं अभिनंदनन करतानाच विचारसरणी आणि मूल्यांची लढाई सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here