सीबीआय चौकशीला तयार – संभाजी भिडे

कोणतीही चौकशी करा मी तयार आहे - संभाजी भिडे

0

कोरेगाव भीमा प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आज आपली भूमिका मांडली.

हा सर्व प्रकार बुडाखालची सत्ता गेलेले लोक करतायंत. समाजाची माथी भडकावून हाहाकार माजवत समाज तोडण्याचे हे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कोरेगाव भीमा या ठिकाणी मी गेल्या तीन वर्षांत कधीही गेलो नाही. मात्र मी तिथे होतो असे खोटे आरोप करीत जाणीवपूर्वक माझ्यावर टीका केली जातेय. या प्रकरणात मी सीबीआय चौकशीलासुध्दा तयार आहे. माझा त्या घटनेशी काडीमात्र संबंध नसल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले.

या प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करुन यामधील सत्य बाहेर काढावे आणि जे कोणी दोषी ठरतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे जाहीर आवाहन संभाजी भिडे यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणेला केले आहे.

राज्यात जातीय दंगली माजवून तुकडे करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करीत प्रकाश आंबेडकर यांची चौकशी करण्याची मागणी संभाजी भिडे यांनी केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here