सिंहगडावरुन १५० फुट दरीत पडूनही गर्भवती महिला सुरक्षित

0

सेल्फी काढत असताना सिंहगडावरुन एक गर्भवती महिला पाय घसरुन १५० फूट खोल दरी कोसळली. दैव बलवत्तर होते म्हणून तिचे प्राण वाचले.

शनिवारी 28 वर्षीय प्रणिता इंगळे आपल्या पती आणि भावासह सिंहगडावर फिरण्यास गेली होती. दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद आहे. त्यामुळे पर्यटक गडावर पायीच जात आहेत. गडावर पोहोचल्यावर सगळ्यांनी निसर्गाचा आस्वाद घेतला आणि फोटोही काढले. पण याचवेळी हा अपघात झाला,

प्रणिताचा तोल गेला आणि ती 150 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ज्या ठिकाणी ती पडली तिथे घनदाट झाडी होती. आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक तातडीने मदतीला पुढे आले आणि स्थानिकांनी दीड तासाने तिला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. प्रणिता आणि बाळ सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here