आमदार आबिटकर यांचा कोळवण ग्रामस्थांतर्फे सत्कार

0

मिणचे खुर्द : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या फंडातून कोळवण-पाळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी २३ लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये महादेव मंदिर ७ लाख, ज्योतिर्लिंग मंदिर सुशोभीकरण ५ लाख, अंतर्गत गटर्स ५ लाख तसेच सांस्कृतिक हॉल ६ लाख असा एकूण २३ लाख रुपयांचा निधीचा समावेश आहे. यावेळी उपसरपंचपदी लीलाबाई गुरव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एस. आर. फुटाणे, शिवाजी देसाई, शंकर देसाई, दत्तात्रय गुरव, सुरेश गुरव, उत्तम देसाई, संदीप पाटील, सुनील कांबळे, भिकाजी देवळे, नंदकुमार गुरव, अनिल गुरव व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here