व्यवसायभिमुख शिक्षण ही काळाची गरज- आमदार निरंजन डावखरे

गुरूवार २२ जून रोजी कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगार तसेच करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सावर्डे येथे करण्यात आले होते

0

रत्नागिरी- आत्त्ताच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी निव्वळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवसायभिमुख शिक्षण घेण्याची गरज असल्याचे मत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यानी व्यक्त केले.
समन्वय प्रतिष्ठान व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने गुरूवार २२ जून रोजी कौशल्यविकास, रोजगार व स्वयंरोजगार तसेच करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन सावर्डे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला एक हजारहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

Shopindeal

सावर्डे येथील गोविंदराव निकम हायस्कूल येथील भाऊसाहेब महाडीक सभागृहात मेळावा संपन्न झाला. मेळाव्याची सुरूवात आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याहस्ते करण्यात आली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यानी सुरूवातील उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेखर निकम, पाटणचे सभापती सत्यजित पाटणकर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश पिटोडे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण अध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, शारदा बिडकर, एस. आर, निकम, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी प्रसाद कांबळे, चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविका फैरोद मोडक, शिवानी पवार तसेच जिल्हापरिषद सदस्य उपस्थित होते.
जीवनात यशव्ही होण्यासाठी बदलाची गरज आहे. शिक्षणाचे देखील तसेच आहे. तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा व्यवसाय, त्यासाठी आत्ताच्या काळाला अनुसरून व्यवसायभिमुख शिक्षण घेण्याची गरज आहे. वैद्यकीय क्षेत्र, ऑटोमोबाईल क्षेत्र असे कोणतेही क्षेत्र निवडा त्यात तांत्रिक शिक्षण घेतेलेल्यांना देखील रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध आहेत, त्यादृष्टीने शिक्षण घेतेले तर जीवनात यशस्वी होणार असे निरंजन डावखरे म्हणाले.
आमदार भास्कर जाधव यानी उपस्थिताना आवाहन करताना शिक्षण घेताना आपल्या करिअरची दिशा समजून त्यादृष्टीने वाटचाल करावी असे सांगितले. करिअर गायडन्स बरोबर सरकारी नोकरीची संधी मिळवून देणारे मार्गदर्शन कोकणातील मुलांना मिळावे अशी इच्छा भास्कर जाधव यानी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here