पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी २७ जानेवारी २०१९ रोजी मतदान

0

मुंबई : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि.सातारा), श्रीगोंदा (जि.अहमदनगर), आरमोरी (जि.गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि.नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. . सहारिया यांनी आज येथे दिली.

श्री.सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी : राजापूर (जि.रत्नागिरी)- 6, आळंदी (पुणे)- 9, फलटण (सातारा)- 12, दुधनी (सोलापूर)- 2, पन्हाळा (कोल्हापूर)- 8, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1, बीड– 11, बुलढाणा– 12, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here