नवी मुंबई मनपा उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसमध्ये अस्वस्थता…

0

काँग्रेसचे 10 पैकी 7 नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून फुटण्याच्या मार्गावर – सूत्रांची माहिती

येत्या 9 नोव्हेंबरला होणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.काँग्रेसच्या नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी काँग्रेसतर्फे उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी बंडखोरी केली आहे.दशरथ भगत यांच्या पत्नी व काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी देखील उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे.दशरथ भगत हे काँग्रेसचे जुने,प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.नवी मुंबईत काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी दशरथ भगत यांच मोठं योगदान आहे.काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात दशरथ भगत यांनी पक्षाला उभारी देण्याचं काम केलं होतं.मात्र ऐनवेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दशरथ भगत यांना डावल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.नवी मुंबई महानगर पालिकेतील काँग्रेसचे 10 पैकी 7 नगरसेवक हे स्वतंत्र गट स्थापन करून फुटण्याच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.तसेच नवी मुंबईतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे.सध्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून दशरथ भगत यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दशरथ भगत यांची मनधरणी करण्यात कितपत यश येतं हेच पहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here