पोलिसांना मिळणार स्मार्ट युनिफॉर्म

0

पोलिसांच्या गणवेशात लवकरच बदल करण्यात येणार आहेत. आपले पोलिस कर्मचारी आता स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत. सध्या पोलिस ब्रिटीशकालीन खाकी वर्दी पोषाखात आहेत. आता पोलिसांना वर्षभर आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश दिला जाणार आहे. अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आलं आहे. ही संस्था सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश बनवणार आहे. ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिवेलपमेंटच्या सहकार्याने पोषाखाचे   नमूने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी व जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअर चे  डिझाईनही बनवले आहे. हे डिझाईन सर्व राज्यांतील पोलिसांना शेअर करण्यात आले आहे, जेणेकरुन ते आपल्या पसंतीने गणवेश निवडू शकतील. नऊ राज्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, सध्याच्या पोषाखामध्ये अनेक अडचणी आहेत. पहिली बाब म्हणजे देशातील पोलिसांच्या पोषाखात समानता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचे कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होता. याशिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पर्यायी जागा नाही. पोलिसांची टोपी लोकराची असल्याने उन्हाळ्यात डोकेदुखीचे कारण ठरते. तर हेल्मेट एवढे जड आहेत की आपत्कालीन परिस्थितीत ते घालणे अडचणीचे ठरते. पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्ट्यात फोन ठेवण्याची जागा व स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी. बुट ही पोलिसांसाठी एक समस्या बनली आहे. चामड्याची बुट जास्त वेळ घालणं सोप नसते.  खाकी रंग प्रायव्हेट एजन्सी व इतर विभागातील लोकही वापरतात. खाकीच्या या गोड बातमीमुळे पोलिसदादा आनंदात तर आहेतच पण प्रतिक्षाही खुप खुप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here