पोलीस भरती पूर्वरत करण्यासाठी गडहिंग्लज व उत्तूर मधील विध्यार्थ्यांचे आ.मुश्रीफांना निवेदन

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्यातील पोलीस भरती पूर्वीसारखी व्हावी ह्यासाठी गडहिंग्लज व उत्तूर शहरातील विध्यार्थ्यांनी आज(दि.२) रोजी माजी कामगार मंत्री आणि आ. हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
आ. हसन मुश्रीफ हे आज गडहिंग्लज दौऱ्यावर आले असताना हे निवेदन देण्यात आले, तरी या निवेदनात असे
म्हंटले आहे की दरवर्षी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२ ते १५ लाख आहे. यापूर्वीच्या भरती प्रक्रियामध्ये शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा यांच्या गुणांची बेरीज करून गुणवत्ता यादी ठरत होती. नुकताच ठरलेल्या नविन नियमानुसार शारीरिक चाचणीला महत्व न देता फक्त लेखी परीक्षा आधी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शारीरिक क्षमता असलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे. तरी निवेदनाची दखल घेऊन सरकारने पूर्वीसारखी भरती प्रक्रिया घेऊन आमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करावे अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here