राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील मोकाट झालेले गुंड – खासदार राजू शेट्टी

0

राज्यातील पोलीस म्हणजे खाकीतील गुंड असून सध्या ते मोकाट झाले आहेत.असा  सणसणीत आरोप स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे .तसेच पोलिसांना गोळ्याचा घालायच्या असतील तर खाकीतील गुंडांवर घालावेत अश्या शब्दात संताप व्यक्त केला आहे.  सांगलीतील अनिकेत खून आणि नगर मधील शेतकरी गोळीबार घटनेवरून खासदार शेट्टी यांनी पोलीस खात्यावर हि टीका केली आहे..ते आज सांगली मध्ये बोलत होते.

https://youtu.be/fCy85waHhoc

सांगलीतील पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मृत अनिकेतच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे.यावेळी कोथळे कुटुंबीयांची कैफियत ऐकून घेत.स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे.असा विश्वास देत कोथळे कुटुंबियाला धीर दिला आहे.यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील पोलीस खात्यावर सडकून टीका करत पोलीस म्हणजे खाकीतील गुंड झाले आहेत.आणि हे गुंड सध्या मोकाट फिरत आहे अशी टीका यावेळी केली.तसेच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत गृहखाते असणारये मुख्यमंत्र्यांनि या प्रकरणी अजून लक्ष घातले नाही.या प्रकरणात खाकीतील गुंडांना, वर्दीतील पोलिसांकडून अभय मिळण्याची शक्यता आहे .यामुळे अनिकेत खून प्रकरणाचा तपास सीआयडी ऐवजी सीबीआय कडून झाला पाहिजे अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.तसेच मुख्यमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही. त्याच्याकडे असणारे गृहखाते हे त्यांना बदनाम केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे असे स्प्ष्ट करत जो पर्यंत अनिकेतच्या खुनाचा तपास मुख्यमंत्री सीबीआय कडे देणार नाहीत तो पर्यंत गप्प बसणार नाही. असा इशारा देत खाकीतील गुंड जर मोकाट फिरणार असतील तर एक दिवशी जनताच कायदा हातात घेईल असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला आहे .

तसेच अहमदनगर जिल्ह्यातील ऊस आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी बोलताना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु होते . मात्र पोलिसांच्या कडून लाठीमार झाल्यानंतर शेतकऱ्यांचा संयम सुटला ,पण न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला जात आहे . ते पाहता खाकीतील गुंड मोकाट झाले आहेत .त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळ्या घालण्याऐवजी खाकीतील गुंडांवर गोळ्या घालाव्यात असा संताप यावेळी व्यक्त केला आहे .

https://youtu.be/eNMb7iQw1rU

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here