कुणी कितीही अपप्रचार केला तरी खासदार धनंजय महाडिक हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार – माजी आमदार पी एन पाटील यांचा विश्वास

0

 

करवीर : पन्हाळा तालुक्यातील यवलुज इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला माजी आमदार पी एन पाटील, बाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील, पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार पी एन पाटील म्हणाले, विरोधकांकडून विकासाच्या मुद्द्यावर बोलायला एकही गोष्ट नसल्याने ते बिनबुडाचे आरोप आणि टीका करत सुटले आहेत. पण करवीरची जनता सुज्ञ आहे ती अशा आरोपांना भुलणार नाही. खासदार धनंजय महाडिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विश्वासराव पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग काशीद, डी के कोळी, संजय निकम, भिवाजी कोल्हे,तुकाराम पाटील, सर्जेराव पाटील, जयसिंग हिर्डेकर, सरदार बंगे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here