पंतप्रधान यांनी साधला घरकुल लाभार्थ्यांशी थेट संवाद….

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर – शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी येथून प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुलांचे ई-वितरण केलं.

या कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यलया मार्फत पालघर, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि वसई तालुक्यातील महिला लाभार्थ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून सहभागी झाल्या होत्या. पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर , पालघर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक माणिक दिवे यांनी पालघर येथील गांजे ढेकाळे येथे उपस्थित राहून ओबी वाहनाच्या माध्यमातून सदर कायर्क्रम महिला लाभार्थी यांच्या समवेत पाहिला.

यावेळी प्रधान मंत्री यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, उज्वला योजना, आयुष्मान योजना आणि स्वच्छ भारत मिशन आदि योजनान बाबत मार्गदर्शन हि केले. प्रसंगी वाडा तालुक्याच्या गट विकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, तलासरी तालुक्याचे गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे, विक्रमगड तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रदीप डोलारे आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here