नवी मुंबई महानगरपालिकेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

0

जयश्री भिसे

शहरात दिवसें दिवस गंभीर होत असलेली कचरा समस्यां सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली. त्याचाच एक भाग म्हणून शहरात बंदी असतानाही 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडून गेल्या महिन्याभरात तब्बल अडीच हजार टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून त्याच्याकडून सुमारे ३० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांनी दिली. प्लास्टिक मुक्त संकल्प करणारी ही पहिली महापालिका असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी पनवेल महापालिकेच्या सभेत प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. 50 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्याचे विघटन होत नसल्याने या पिशव्यांवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे.मात्र, त्या नंतरही मोठ्या प्रमाणात या पिशव्याची विक्री तसेच वापर सूर असून शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात या पिशव्याचे प्रमाण लक्षनिय आहे. त्या मुळे महापालिका प्रशासनाने या पिशव्याच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्या नुसार मागील महिन्याभरात सर्व ६ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकाच वेळी या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत असून ही कारवाई नियमित सुरु ठेवली जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनाने केलेल्या या कारवाईत सुमारे २३६० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केले असून त्यात सर्वाधिक ९२३ किलो प्लास्टिक पिशव्या खारघर क्षेत्रीय कार्यालयाच्या ह्ददीत जप्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here