गडहिंग्लज तालुक्यातील निर्सग पर्यटनबाबत आ. कुपेकरांचे पर्यटन मंत्र्यांना निवेदन

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड, शिवमंदिर, भिमसासगिरी याला निसर्ग पर्यटन व वेलनेस सेंटरला मंजूरी द्यावी, अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघांच्या आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी राज्याचे पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, निसर्गरम्य व ऐतिहासिक किल्ले सामानगड़ावर शिवराम सीतामाई भक्तिधाम चिंचेवाडी या धर्मादायी संस्थेने निसर्ग पर्यटन व वेलनेस सेंटर सुरू करण्यासाठी शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सामानगड परिसराचा सर्वांगीण विकास होऊन सर्व सुविधा गडावर मिळणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. असे झाल्यास स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पाला शासनाने निधीसह मंजूरी द्यावी.

तसेच चंदगड विधानसभा मतदार संघातील ऐतिहासिक किल्ले सामनगड येथील निसर्ग रम्य परिसरातील शिवराम सीतामाई भक्तिधाम, चिंचेवाडी (सामनगड) या धर्मादाय संस्थेने या परिसरात निसर्ग पर्यटन केंद्र व वेलनेस सेंटर सुरु करणेचा प्रस्ताव आपल्याकडे पर्यटन धोरण अनुसरून निधीसह मंजुरीसाठी सादर केलेला आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राद्वारे बहुउद्देशीय हॉल, भोजन कक्ष, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, रस्त्यांच्यादुतर्फा वृक्षारोपण, पर्यटकांना मनसोक्त फिरण्यासाठी फुटपाथ, वाहनतळ, सौरऊर्जा, पथदिवे, माहिती फलक, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, लहान मुलांच्या करीत बालोद्यान, पाणीपुरवठा ज्ञान केंद्र, ध्यान केंद्र, पर्यटकाकरिता आरोग्य सुविधा केंद्र इत्यादी उभारणी केली जाणार आहे. यासर्व सुविधा इतिहास किल्ले सामनगड या पर्यटनस्थळात भेट देण्याकरिता महाराष्ट्रातून इतिहास प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना सर्वसुविधा दिल्यास पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दस्तुर खुद्द छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श हा सामनगडास झालेला असल्यामुळे या किल्ल्यास अन्य साधारण महत्व इतिहासामध्ये आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून शासनाच्या पर्यटन धारणास अनुसरून असणारी शिवराम सीतामाई भक्तिधाम संस्थेने आपल्या जागेमध्ये सादर केलेल्या रुपये ४ कोटी ६९ लाखाच्या निसर्ग पर्यटन केंद्र या प्रस्तावास निधीसह मान्यता देणेबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here