२०१८ तील निच्चांकी दरावर पेट्रोल

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा २०१८ मध्ये भडका उडाला होता. गेल्या काही दिवसांत इंधन दरात सातत्याने घट होऊन पेट्रोल आणि डिझेलचे दर वर्षभरातील नीचांकी पातळीवर आले आहेत. २०१८ मधील सर्वात स्वस्त पेट्रोल सोमवारी मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल सोमवारी ७४.४७ रूपये प्रतिलिटर आहे. मुंबईत प्रथमत:च पेट्रोलदराने प्रतिलिटर ७५ रुपयांच्या खालील पातळी गाठली आहे. दिल्लीमध्ये सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर ६८. ८४ रूपये आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरात दीड महिन्यांपासून सतत कपात होत असून रविवारी पेट्रोलदर प्रतिलिटर २२ पैशांनी तर, डिझेलदर प्रतिलिटर २४ पैशांनी कमी करण्यात आले होतं. सोमवारी यामध्ये आणखी कपात झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर अनुक्रमे ७४.४७ व ६५.७६ रूपये नोंदविण्यात आले. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे ६८.८४ आणि ६२.८६ रूपये नोंदवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या इंधनाच्या किंमती घसरत असल्याचा भारतासारख्या देशांना फायदा होत असून पेट्रोल व डिझेलच्या देशांतर्गत किंमतींनी चालू वर्षातील नवा नीचांक नोंदवला आहे. १८ ऑक्टोबरपासून पेट्रोल दरात १३.७९, तर डिझेलच्या दरात १२.०६ रुपयांची घसरण झाली आहे. इंधन दरवाढ शंभरी गाठणार, अशी शक्यता वर्तवली जात असताना केंद्र सरकारनं पावलं उचलत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दीड रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच इंधन कंपन्यांना प्रति लीटरमागे एक रुपयाचा तोटा सहन करण्यास सांगितलं होतं. सरकारच्या या निर्णयानंतर इंधन दरात घसरण होऊ लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here