हलकर्णीत मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त पेन व फळे वाटप

0

 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :

९ मार्च रोजी महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना झाली. मनसेने मराठी तरुणांसाठी तसेच मराठी अस्मितेसाठी विविध प्रकारची अांदोलने हाती घेतली. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रकारची समाज कार्य सुध्दा चांगल्या प्रकारे केली .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे तालुका अध्यक्ष राज सुभेदार यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी पेन व फळे वाटप वाटप करण्यात आली. यावेळी मुलांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहुन समाजा प्रति जाण आसलेला पक्ष मनसेच आहे यांची प्रचिती आली.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राज सुभेदार यांनी केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक मनगुतकर, गडहिंग्लज तालुका सचिव प्रफुल्ल आठले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, प्रफुल्ल आठले उपस्थित होते. यावेळी उपतालुकाध्यक्ष अमर कांबळे, अभिजीत कांबळे, राजु बोकडे, संदेश आवडण, नितेश नाईक, रुपेश कुंभार तसेच शाळा कमिटी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here