गोरगरिबांच्या डॉक्टरला आयुष्य देगा मामा: बहुजनांच्या नेत्यासाठी बहुजन देवाकडं साकडं

0

By Newstale
Correspondent
Murgud 13 April 2019

गोरगरीबांच्या डॉक्टरला आयुष्य देगा मामा….

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी बाळूमामांना साकडे

संतोष कांबळे व सहकाऱ्यांनी तब्बल 16 किमी घातला दंडवत

राज्यातील लाखो गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवेतून जीवदान देणाऱ्या गोरगरिबांचा डॉक्टर आम हसन मुश्रीफ दीर्घायु व्हावेत.करोडो रुग्णांची सेवा त्यांच्या हातून व्हावी.लोकांचा आशीर्वाद भरभरून लाभावा.विधानसभा निवडणुकीत ते प्रचंड मताने विजयी होवून मंत्री व्हावेत’ असे साकडे बाळूमामा चरणी घालण्यासाठी सोनगे तालुका कागल येथील संतोष कांबळे व यांच्या 21 सहकाऱ्यांनी आज शनिवार सकाळी साडेसहा वाजलेपासून सोनगे ते आदमापुर येथील बाळूमामा मंदिरापर्यंत तब्बल 16 किमी अंतर दंडवत घालत या यवकांनी सद्गुरू बाळूमामांना साकडं घातले.

सोनगेे येथील ग्रामदैवत चौंडेश्वरीचे दर्शन घेऊन या दंडवत सोहळ्यास प्रारंभ झाला.मार्गावरील कुरुकली,सुरुपली,मुरगुड,निढोरी येथील ग्रामस्थांनी या दिंडीचे उत्साही स्वागत केले.ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प,पुष्पहार घालून दंडवत कर्त्यांना सन्मानित केले.पेढे-साखर वाटून आनंद साजरा केला.सोनेगे पासून आदमापुर पर्यंत सुमारे 16 किलोमीटर अंतर या कार्यकर्त्यांनी दंडवत घातला.सकाळ पासून उन्हाचा प्रचंड तडाखा होता.

रणरणत्या उन्हात देखील या युवकांनी मुश्रीफांच्या दीर्घायुष्यासाठी बाळूमामांची प्रार्थना करत आदमापुर पर्यंत दंडवत पूर्ण केला.यामध्ये संतोष कांबळे,शशिकांत कांबळे, बाबासाहेब लोंढे,यशवंत देवडकर,सुशांत देवडकर,नितीन पाटील,धनाजी मांगोरे, विजय पाटील,कांता वाघमारे बीड,अमर डावरे,जयवंत गुरव,रवी कांबळे,कृष्णात कांबळे,निलेश ढोले,संदीप ढोले,विकास ढोले,प्रमोद कांबळे,सौरभ पवार,रामदास पाटील,मोहन गुरव,विष्णू गुरव,आकाश चिंदगे आदींचा समावेश होता.

दंडवत सोहळ्यामध्ये बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले,जिल्हा बॅंकेचे संचालक रणजितसिंह पाटील, विठ्ठल पाटील, सोनगे सरपंच महादेवी कांबळे,जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे,शिवाजी पाटील,विकास पाटील,नारायण ढोले,देवानंद पाटील,जगदीश पाटील,जयदीप पवार,किरण पाटील,रणजित सुर्यवंशी,दिगंबर परीट,शामराव घाटगे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते,सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कर्मचारी,विविध गावातील कार्यकर्ते
सहभागी झाले होते.

आदमापुर येथे बाळूमामाचे दर्शन घेऊन साडे अकरा वाजता दंडवत सोहळ्याची सांगता झाली.या प्रसंगी दंडवत कर्त्यांचा आमदार मुश्रीफ यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला

संतोष कांबळे म्हणाले”गोरगरिबांचे उपेक्षितांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले आमदार हसन मुश्रीफ हे खऱ्या अर्थाने देवदूतच आहेत राजकारणाबरोबरच समाजकारणाच्या माध्यमातून आणि विशेषता पब्लिक ट्रस्ट अॅक्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना त्यांनी जगण्याची नवसंजीवनी दिली आहे.अशा अनेक व दलित उपेक्षित आणि त्यांच्या रक्षणासाठी किंबहुना त्यांना जगण्याची उर्मी देण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व आम्हाला समाजाची गरज आहे आणि त्या भावनेतूनच त्यांना दीर्घायुष्य लावण्यासाठी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने विजय होण्यासाठी मी आणि माझे ग्रामस्थ आदमपूर येथील श्री बाळूमामा देवालय पर्यंत हा दंडवत सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्याला माझ्या ग्रामस्थांबरोबर रस्त्यावरील आणि तालुक्यातील सर्वच गावाच्या ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here