पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीत कुत्रासुध्दा विचारणार नाही – निलेश राणे

राणे सुपुत्राची अजित पवारांवर जहरी टिका

0

मुंबई : नारायण राणेंचे चिरंजीव नीलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर शेलक्या शब्दात टिका केलीय. अजित पवार यांनी नारायण राणेंचे आगीतून उठून फुफाट्यात पडल्याचा प्रकार झाल्याचे वक्तव्य केल्यानंतर नीलेश राणे यांनी त्यांच्यावर व्टिटवरुन टिका केलीय.

पवार आडनाव काढा तुम्हाला बारामतीत कुत्र देखील विचारणार नाही असं व्टिट निलेश राणे यांनी केलंय. सोबतच राणेंनी स्वता:च्या हिमतीवर सर्व पदं मिळवळीत तुमच्यासारखी फुकट पदं मिळाली नसल्याचे देखील व्टिटमध्ये लिहलं आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या या व्टिट चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. निलेश राणेंनी एवढ्या खालच्या थराला जावून टिका केल्याने त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या सोशल साईटवरुन टिकेला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे हा वाद थांबणार का आणखी पेटणार हे येणा-या काळातच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here