राष्ट्रवादीत शरद पवार विरुद्ध अजित पवार वादाचा नवा अध्याय?

0

मुंबई (प्रतिनिधी) :

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचे जाहीर केले. यामागची विविध कारणे समोर येत आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे शरद पवारांचा नातू पार्थ पवार याला मावळ मतदार संघातून तिकीट दिले जाणार आहे. परंतु पवार घराण्यातून केवळ एकच जण निवडणूक लढेल, असा शरद पवारांचा आग्रह आहे. त्यामुळे नातू पार्थसाठी शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

पार्थ पवारला उमेदवारी देण्याबाबत नकार असतानाही मावळ मतदारसंघात पार्थ पवारचे विविध कार्यक्रम सुरू आहेत. युवा संवाद, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींसाठी पार्थ मावळमधून फिरत आहे. मावळमधून संजोग वाघेरे निवडणूक लढण्यास इच्छूक होते, परंतु पार्थच्या नावाचा दबदबा वाढल्यामुळे त्यांचे नाव पुढे आलेच नाही.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांशी पार्थच्या उमेदवारीबाबत स्वतःहून बोलले नाहीत, परंतु त्यांनी इतर माध्यमातून शरद पवारांवर पार्थला उमेदवारी द्यावी यासाठी दबाव ठेवला होता. या सर्व प्रश्नांवर उत्तर म्हणून शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. निवडणुकीतून माघार घेऊन पवारांनी राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांना जोरदार दणका दिला आहे. परंतु या सर्व घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षांचा हा नवा अध्याय सुरु झाला आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here