ऊस भस्मसात झाल्याच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0

पाटगाव : भुदरगड तालुक्यातील अनफ खुर्द येथे ऊस जळल्याची बातमी काळातच शेतकरी अहमद करीम खान (वय ६३) यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली. अनफ खुर्द व बिरजवाडी दरम्यान असणाऱ्या पठाणांचा नंबर व थड्याची राई या शेतांना वनहद्दीतुन आलेल्या आगीमुळे अहमद करीम खान, राजाराम डाफळे व कृष्ण डाफळे यांच्या मालकीच्या उसाला आग लागली. यामध्ये जवळपास पाच एकरातील ऊस जाळला. ही बातमी ऊस मालक अहमद करीम खान यांना समजताच त्यांनी शेताकडे धाव घेतला. उसाला आग लागलेली पाहताच अहमद करीम खान यांना मानसिक धक्का बसला व ते तिथेच कोसळले. त्यांना त्यांची पत्नी, भाऊ व मुलगा यांनी तातडीने तांबाळे येथील खासगी रुग्णालयात हलवले तेथून पुढील उपचाराकरिता नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अहमद खान हे परिसरात ‘चाचा’ म्हणून परिचित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here