परिवर्तनाची सुरवात उत्तूरमधून करा : समरजित घाटगे

0

उत्तूर (प्रतिनिधी) : परिवर्तनाची सुरवात उत्तूर (ता. आजरा) विभागापासून करा, असे आवाहन ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. ते येथील हनुमान मंदिरमध्ये झालेल्या वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते.
प्रवीण लोकरे यांनी स्वागत केले. घाटगे म्हणाले, “दोन वर्षांपासून या विभागाच्या संपर्कात आहे. या विभागाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे येणारी विधानसभा निवडणूक जनता आपल्या हातात घेणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.”
वडकशिवालेचे सरपंच संतोष बेलवाडे, उपसरपंच संजय शिंदे, संजय धुरे, विनायक व्हणबत्ते, रमेश वेसणेकर, विठ्ठल कदम, वामन आपटे यांची भाषणे झाली. या वेळी श्रीपती यादव, शिवलिंग सत्रे, बाळासाहेब हजारे, दत्तात्रय मुळीक, पांडुरंग बरगे, केरबा कुंभार, गंगाधर पाकले, संजय पोतदार, भैरू सावंत, धनाजी उत्तूरकर उपस्थित होते. दीपक आमनगी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here