सानियाच्या जीवनावरील आगामी चित्रपटात सानियाच्या भूमिकेत दिसणार परिणीती

करण जोहर आणि रोहित शेट्टी बनवणार सिनेमा

0

प्रतिनिधी- शशांक पाटील
मुंबई: सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा ट्रेंड बॉलीवूड मध्ये सुरु आहे भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी वर चित्रपट बनला आणि तो बॉक्स ऑफिस वर चांगलाच हिट झाला त्यानंतर बऱ्याच खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक येणार असल्याची चर्चा आहे. यातच भारताची प्रसिद्ध टेनिसपट्टू सानिया मिर्झा हिच्या जीवनावर देखील चित्रपट बनणार असल्याची चर्चा आहे हा चित्रपट करण जोहर आणि रोहित शेट्टी बनविणार असल्याची खबर आहे.

मुख्य म्हणजे या चित्रपटात सानियाची भूमिका तिची अतिशय जवळची मैत्रीण असणारी परिणीती चोप्रा हि साकारणार असल्याची बातमी आहे. सानिया आणि परिणीती या फार चांगल्या मैत्रिणी असून सानियाची अशी इच्छा आहे कि तिच्या जीवनावरील चित्रपटात तिची भूमिका हि परिणितीनेच साकारावी. तिच्या मते त्या दोघी दिसायला तसेच शारीरिक रित्या एकमेकींशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यामुळे ह्या सिनेमातील सानियाची भूमिका परिणितीच करणार असल्याची चर्चा सर्वत्रा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here