पारगड ते मोर्ले रस्त्याच्या कामाचा भाजप नेते रमेश रेडेकर व भाजप मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

0

 

चंदगड (प्रतिनिधी) : पारगड (ता.चंदगड) ते मोर्ले (ता.दोडामार्ग ) या बहुप्रतिक्षित व चंदगड-दोडामार्ग-गोव्याला जोडणार्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज दोडामार्ग व चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.हा रस्ता व्हावा व येथे दळणवळणाची सोय होऊन येथील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी “मोर्ले-पारगड संघर्ष समितीने” २००३ पासुन जवळपास १७ उपोषणे केली.अनेक नेते मंडळींकडे पाठपुरावा केला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही.२०१४ ला भारतीय जनता पार्टीचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यानंतर संघर्ष समितीने भाजपाच्या स्थानिक नेते मंडळींच्या मार्फत महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला व त्याला यश आले.ना.चंद्रकांत दादांनी पारगड-मोर्ले या ३.८ कि.मी.रस्त्यासाठी रुपये १० कोटी ८० लाख निधी मंजूर केला.”मोर्ले-पारगड संघर्ष समितीचे” अध्यक्ष ज्ञानेश्वर चिरमुरे ,सदस्य रघुवीर शेलार,रमावती कांबळे, प्रदीप नाईक,पंकज गवस यांनी या रस्त्यासाठी जवळपास १७ उपोषणे केली.त्यांच्या या लढ्याला अखेर यश आले.यावेळी भाजपा नेते मा. रमेशराव रेडेकर म्हाणाले,या यशाचे खरे मानकरी हे संघर्ष समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेणारे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.मा.गोपाळराव पाटील म्हणाले,चंदगड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहुया.भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष मा.राजेंद्र म्हापसेकर म्हणाले, यापूर्वी चंदगड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ता शोधावा लागत होता.पण आता मा.रमेशराव रेडेकर, गोपाळराव पाटील, नामदेवराव पाटील यांच्या माध्यमातून भाजपा घराघरात पोहोचली आहे.यावेळी भाजपा नेते रमेशराव रेडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष व विद्यमान जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर, कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील,चंदगड तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सरपंच संजय पवार,माजी सरपंच विद्याधर बाणे,संजय रेडेकर, चंद्रकांत दाणी,रामलिंग दुध्यागोळ,मल्हार शिंदे, युवराज जाधव,बुधाजी पवार, संघर्ष समितीचे सदस्य, दोडामार्ग-चंदगड मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी, पारगड ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.स्वागत सरपंच संजय पवार यांनी केले तर आभार संघर्ष समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन “मोर्ले-पारगड संघर्ष समिती” व ग्रुप ग्रामपंचायत पारगड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here