‘स्नेहल’मागतेय न्याय:मुरगूडच्या पीडीत मुलीच्या आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा !

0

युवतीच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तीवर अद्याप कारवाई नाही ? पीडीत मुलीच्या आईवडिलांचा आत्मदहनाचा इशारा !
मुरगूड प्रतिनिधी
मुरगुड गावभाग येथील युवती स्नेहल राजाराम तोडकर हिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ पीडित युवतीच्या आईवडिलांनी मुरगूड पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
कु.स्नेहल राजाराम तोडकर हिचा विवाह कुरुकलीता.कागल येथील सैनिक कृष्णात चौगले यांच्याशी निश्चित केला होता तेंव्हापासून त्यांच्यातील संबध दृढ होत गेले.पण स्नेहलचे दात व उंचीच्या कारणावरून नियोजीत लग्नास सैनिक कृष्णात चौगले याने नकार दिला या नैराश्यातून स्नेहलने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली या घटनेस सैनिक कृष्णात चौगले याचे आई- वडिल व बहिण जबाबदार आहेत.त्यामूळे त्यांच्याविरुद्ध स्नेहलच्या आईवडिलांनी मुरगूड पोलीसात तक्रार दिली होती. त्यानुसार सैनिकासह त्याच्या कुटुंबातील पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पण यास२० दिवसाचा कालावधी लोटला तरी पुढील कारवाई पोलीसाकडून झालेली नाही त्यामूळे पोलीसांच्या भूमिकेविषयी संशय येत असल्याने पीडीत युवतीचे वडील राजाराम पांडुरंग तोडकर व आई सौ.भाग्यश्री तोडकर यांनी मुरगूड पोलीस ठाण्यासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे.

तपास चालू आहे,पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय ठेवू नका....
या प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्याचा तपास चालू आहे.तपासाअंती कारवाई केली जाईल.पोलीसांची भूमिका स्वच्छ आहे त्या बदल संशय नसावा.
विठ्ठल दराडे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगूड )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here