७० लाखांची रोकड लुटणाऱ्या आरोपींचा शोध लावण्यात पंढरपूर पोलिसांना यश

0

– चंद्रकांत ऐवळे –

पंढरपूर :- बुधवारी १ नोव्हेंबर रोजी पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावाजवळ बॅंक ऑफ महाराष्ट्रची ७० लाखांची रोकड लुटणाऱ्या आरोपींचा शोध लावण्यात पंढरपूर पोलिसांना यश आले आहे . प्रार्थमिक माहिती नुसार सांगोला शाखेचा व्यवस्थापक फिर्यादी अमोल भोसले हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे . रात्री उशीरा पोलिसांनी मंगळवेढ्यातील एका गावातुन ७० लाख रुपये ताब्यात घेतले आहेत . एका सरपंचाने हि रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे पुढे येत

मिळालेल्या माहिती नुसार बॅंक व्यवस्थापक अमोल भोसले हा कर्जबाजारी झाला होता . त्याला बाहेरचे अनेक नाद होते . सांगोल्याला येण्याअगोदर मंगळवेढा तालुक्यातील नदेश्वर शाखेला व्यवस्थापक होता . त्यावेळी त्याची ओळख शेजारील गावातील काही तरुणांशी झाली होती. लुटीचा बनाव करण्यासाठी त्याने ह्या तरुणानां हाताशी धरले. निम्मे तुम्ही निम्मे आम्ही या तत्वावर हे तरुण तयार झाले. चित्रपटाची पटकथा असावी अशी कथा भोसलेनी तयार केली आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला . पण त्यांच्या या बनवाबनवीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही . चौकशीची सुरवातचं भोसले पासुन केली . अशातचं व्यवस्थापक भोसले चे आयडिया कंपनीचे सिम कार्ड घटनास्थळी सापडले होते .

तसेचं व्यवस्थापक भोसले हा सुरवाती पासुनचं उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याचा सात बारा उतारा काढला होता. त्यामुळे पोलिसांचे काम आणखी सोपे झाले . काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस सर्व शक्यता पडताळून पाहात आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here