भूकंपग्रस्तांना शिवसेनेचा मदतीचा हात

0

 

पालघर-योगेश चांदेकर : 

पालघर- गेल्या तीन महिन्यांपासून पालघर जिल्हा भूकंपाने हादरत असतांना शासनाकडून येथील भूकंपग्रस्त नागरिकांना मिळणारी मदत अत्यंत तोकडी पडत असल्याने शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी डहाणू तालुक्यातील करंजविरा पाटीलपाडा येथील ग्रामस्थांना अत्यावश्यक असणारे ब्लॅंकेट, चटई व चादरींचे वाटप शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या दोन तीन महिन्यांपासून डहाणू तालुक्यातील परिसरात भूकंपाचे धक्के बसत असून दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे अनेक घरांची, शाळांची पडझड होत असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. शासनामार्फत भूकंपग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न करत असते परंतु ही मदत अगदी तोकडी असल्याने शिवसेनेच्या शिकवणीनुसार व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आवाहनानुसार निलेश गंधे यांनी करंजविरा पाटीलपाडा या सुमारे १५० लोकवस्ती असलेल्या आदिवासी व गोरगरीब नागरीकांना आवश्यक असणारे ब्लॅंकेट, चटई व चादरीचे वाटप केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना गंधे म्हणाले कि, भूकंपग्रस्त भागातील नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रकारे सर्वतोपरी मदत करण्यात येत असून ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांचे नुकसान झाले आहे त्या शाळांची दुरुस्तीही अग्रक्रमाने करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

करंजविरा पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, जेष्ठ शिवसैनिक प्रमोद घोलप, माजी सरपंच रामा पटारा, जगदीश मेढा, वसंत कोम, जेठा पटारा, शिवसैनिक व पदाधिकारी आदींसह स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here