पैलवान, वस्तादांचा महाडिकांना पाठिंबा

0

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना पैलवान आणि वस्तांदानी पाठिंबा दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महान भारत केसरी दादू चौगुले होते.

दादू चौगुले म्हणाले, ‘निरोगी युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. महाडिक यांना लहानपणापासून व्यायाम व कुस्तीची आवड असून त्यांनी शरीर कमावले आहे. मन, मनगट, मेंदू सक्षम ठेवणारे पैलवान महाडिक विरोधी उमेदवाराला लोकसभा निवडणूकीत चितपट करतील.’ महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर म्हणाले, ‘महाडिक हे कुस्तीपटू असून ते कुशल संघटक आहेत. सढळ हाताने मदत करुन त्यांनी कुस्तीला आश्रय दिला आहे. जिल्ह्यातील पैलवानांचे ते आधारस्तंभ असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.’

खासदार महाडिक म्हणाले, ‘मी नियमित व्यायाम करत असून निव्यर्सनी आहे. कोल्हापूर जिल्हाही निरोगी आणि निव्यर्सनी असला पाहिजे. त्यासाठी शालेय वयात क्रीडा संस्कार रुजवले पाहिजेत. कुस्तीबरोबर खूप वाचन, मनन चिंतन केल्याने मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. यावरुनच पैलवान प्रचंड बुद्धिमान असतात हे सिद्ध होते.’

यावेळी पैलवान अशोक माने, संभाजी वरुटे, राजाराम मगदूम, अमृत भोसले, यशवंत दोनवडेकर यांची भाषणे झाली. मेळाव्याला वस्ताद रसूल हनिफ, रंगा ठाणेकर, संतोष पाटील, सर्जेराव पाटील, विलास पाटील, रविंद्र पाटील, शाहू चव्हाण यांच्या जिल्ह्यातील विविध तालमींचे वस्ताद व पैलवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here