गडहिंग्लजमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई

0

गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे आठवडा बाजारात रविवारी उघड्यावर बटर, खरी, टोस्ट व फरसाणा विकणाऱ्या १३ व्यापाऱ्यांवर अन्नभेसळ खात्याने कारवाई केली.
अन्नसुरक्षा सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी अशोक कोळी, रमाकांत पाटील यांनी ही कारवाई केली. यात प्रकाश अशोक नंदनवाडे (रा. नूल), सूर्यकांत बाळासाहेब चौगुले, चंद्रकांत बाळासाहेब चौगुले, सुरेश मायाराम गुप्ता, रमेश बद्रीपाल, जिलानी लाला नवर, जाहीर लाला नवर, शिवाजी मारुती कदम, विजयकुमार संतराम गुप्ता (सर्व रा. निपाणी), जावेद कासीम टिनवाले, अब्दुलअजीज सिकंदर माकानदार (रा. गडहिंग्लज), अशोक सुबराव नंदनवाडे(रा. नूल), चंद्रकांत महावीर शिखरे (रा. बसर्गे) यांच्यावर कारवाई झाली आहे. यातील काहीजण बेकारी माळ विकण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. प्रत्येकी १ हजार रु. दंड घेऊन समज देऊन त्यांना सोडून दिल्याचे सांगण्यात आले.
फिरत्या व्यापाऱ्यांवर बाजारादिवशी गडहिंग्लज येथे कारवाई झाल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here