रमेशराव रेडेकर युवा फाउंडेशन च्या वतीने नेसरीत ‘’आम्ही सह्याद्रीच्या लेकी’’ कार्यक्रमाचे आयोजन

0

८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रमेशराव रेडेकर युवा फाउंडेशनच्या वतीने ‘आम्ही सह्याद्रीच्या लेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नेसरी येथील साखरे मंगलकार्यालयात सकाळी १० वाजल्यापासून आयोजित या कार्यक्रमास गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर, नेसरीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. रिजवाना नदाफ आणि साहित्यिका पारुताई नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

सकाळी १० वाजता  प्रादेशिक आणि राष्ट्रीय वाहिनीवर गौरव मिळवलेल्या कोल्हापुरातील मुलींच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके नेसरीच्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्यासमोर होणार आहेत.

देवचंद कॉलेजच्या निवृत्त प्राचार्या कमल हर्डीकर यांचे ‘’महिला सबलीकरणाची साधने’’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

चंदगड,आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

तीनही तालुक्यातील महिला सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,राजकीय,सामाजिक,कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन रमेशराव रेडेकर युवा फाउंडेशनच्या वतीने महिला आणि युवतींना करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here