ऑर्गेनिक औषधं ही काळाची गरज – डॉ.व्यंकटेश जोशी

0

राजू म्हस्के

आपलं शरीर हेच रोगप्रतिकार करण्यासाठी समर्थ आहे एखादी गाडी बिघडल्यावर त्या गाडीला आपण दुरूस्त करण्यासाठी आवश्यक ते सर्व करतो पण आपल्या शरीराकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. फळं, भाजीपाला याकडे होणारं दुर्लक्ष, बदलती जीवनशैली,अनावश्यक गोळ्यांचा भडीमार हेच आजारांना निमंत्रण देण्याचं निमित्त असतं. 5 नोव्हेंबर रोजी एसडीएफ होलिस्टिक तर्फे आयोजीत सेमीनारमध्ये डॉ. व्यंकटेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं त्यावेळेस ते बोलत होते.

या सेमीनारमध्ये किडनीचे विकार, कँन्सर, पार्कींन्सन्स, मधुमेह, ब्लड प्रेशर ब्रेस्ट कँन्सर अशा अनेक विकारांवर डॉ. व्यंकटेश जोशी यांनी मार्गदर्शन केलं. पंचकर्माची वैशिष्ठे, पंचकर्म नेमकं कसं करावं त्याचं महत्व काय याबद्दलही मार्गदर्शन केलं गेलं. मुळात कँन्सरची सुरूवात कशी होते, त्याची लक्षणं काय असतात, कि़डनीचं काम नेमकं कसं चालतं, नैसर्गिक औषधांचा परिणाम नेमका कसा फायदेशिर ठरतो, ऑरगँनिक औषधं ही निसर्गाची देणगी आहे. आपले पूर्वज आणि त्यांनी केलेल्या नोंदी,निरीक्षणं संपूर्ण शास्त्रीय पद्धतीवर अवलंबुन आहे. मात्र आज आपण परदेशी औषधांमागे आंधळेपणे धावतोय हे ही या सेमीनारमध्ये आवर्जुन सांगण्यात आलं. यावेळेस उपस्थितांनी पुन्हा एकदा अशा प्रकारची शिबीरं वारंवार आयोजीत करण्यात यावी अशीही विनंती केली. कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन उपस्थित रूग्णांतर्फे करण्यात आलं.ऑर्गेनिक औषधं ही काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here