लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची- डाॅ नंदाताई बाभुळकर.

0

 

महागाव ( वार्ताहर ) :

देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आघाडीचे सरकार येणे महत्त्वाचे आहे त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी खासदार धनंजय महाडिक पुन्हा लोकसभेत प्रचंड मताधिक्यानी निवडुण देणे गरजेचे असे आवाहन डाॅ नंदाताई बाभुळकर यांनी केले.

डाॅ नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, वाढत्या बेरोजगारी मुळे तरूण देशोधडीला लागला असताना बेकारी कमी करण्यासाठी या सरकारच्या काळात कोणतीही चर्चा केली गेली नाही.
गेल्या 5 वर्षात तीन कोटी शेतमजुरांचा रोजगार गेलाय.
महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.
नोटाबंदी तर अक्षरशः गरीब जनतेवर लादली गेली.
सत्ताधारी सरकार सत्तेवर आल्यापासून गोरगरीब जनता वाढत्या महागाईला त्रासली असून जीएसटी ,नोटा बंदीच्या निर्णयाने अच्छे दिन कधी सच्चे झालेच नाहीत, देशात वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांना दिलेला सरकारने न्याय पाहता हे सरकार अयशस्वी सरकार म्हणून संबोधले जात आहे
त्यामुळे अशा सरकारला आपण त्यांची जागा दाखवून देऊया. मोदी सरकारची प्रचंड मोठी लाट असताना देखील विरोधी बाकावर बसून संसदेत मुलुख मैदान तोफ डागणारे खासदार धनंजय महाडिक हे तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झाले. राज्यात सर्वाधिक निधी खेचून विकास कामाची गंगा कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धनंजय महाडिक यांनी आणली .आपण सर्वांनी त्यांना मतदारसंघातून नंबर एकचे मताधिक्य देऊ असा विश्वास डाॅ नंदाताई बाभुळकर यांनी व्यक्त केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here