विरोधकांच्या विकासाच्या घोषणा म्हणजे लबाडाघरचं आवतन – आमदार हसन मुश्रीफ यांचा घणाघात

0

 

कागल ( प्रतिनिधी ) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, युवराज पाटील, भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. खोटं बोल पण रेटून बोल अशी मनोवृत्ती विरोधकांची आहे. त्यांची विकासाची योजना म्हणजे निव्वळ लोणकढी थाप आहे अशा शब्दात त्यांनी विरोधकांचे वाभाडे काढले. निवडणुकीच्या तोंडावर उगवायचं, जनतेत मिसळायचं आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष नॉटरिचेबल राहायचं ही विरोधकांची सवय आता जनतेला चांगलीच ठाऊक झाली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देईल असा टोलाही आमदार मुश्रीफ यांनी हाणला.

याप्रसंगी राजश्री माने, रणजीत कांबळे, अनिल पाटील, कसबा सांगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, अविनाश मगदूम, राहुल हेरवाडे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विठ्ठल चव्हाण, मारुती पाटील, प्रकाश शिनगारे, रावसाहेब मगदूम,जालंदर लगारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here