देशाचा मानबिंदू असलेल्या सेनादलातील संधी

0

जगातील सर्वात बलशाली सेनादल असणाऱ्या देशांत भारताचा लौकिक आहे. भारताकडे सर्वात मोठे लष्कर- भू-सेना आहे. १७७६ मध्ये ईस्ट इंडीया कंपनीने भारतीय सेनेची स्थापना केली. सध्या देशात भारतीय सैन्याच्या ५३ छावण्या आणि ९ सैन्य आहेत. जगातील सर्वात उंच युद्ध मैदान असलेल्या सियाचीन ग्लेसियर येथेही भारतीय सेना कार्यरत आहे. ‘One for All and All for One’ हे बोधवाक्य असलेल्या  सेनादलात कोणत्याही पंथाचा आणि धर्माचा विचार केला जात नाही. सेना दलात देशासाठी समर्पण हेच महत्त्वाचे असून, समानतेचा संदेश यातून देण्यात येतो.


थलसेनेत सहभागी होण्याची संधी मिळणे ही भारतीय नागरिकांसाठी अभिमानास्पद बाब असते. जागतिकीकरणामुळे या क्षेत्रात करियरच्या संधी वाढत असून, मनुष्यबळाची आवश्यकता वाढत आहे. आर्मीतील लेफ्टनंट सर्वात उच्च पद आहे. त्यानंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल ब्रिगेडीयर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल त्यानंतर जनरल अशी अधिकाऱ्यांची पदरचना असते. याचबरोबर सुभेदार मेजर, सुभेदार, नायब हवालदार, हवालदार, नाईक नंतर शिपाई अशी वरिष्ठ ते कनिष्ठ पदरचना आहे.

सेनादलात प्रवेश मिळविण्यासाठी शॉर्ट सर्व्हिस कमीशनद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी वय वर्षे १७ ते २७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. दहावी, बारावीपासून ते कला, वाणिज्य, विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी प्राप्त उमेदवार देखील आर्मीत येऊ शकतो. यासाठी मात्र शैक्षणिक पात्रतेबरोबर शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणे देखील आवश्यक असते. दरवर्षी शॉर्ट सर्व्हीस कमीशन, इंडीयन मिल्ट्री अकॅडमीमार्फत प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते. मुख्यत्वे: डिसेंबर जानेवारी आणि जून जुलै या दरम्यान सेनादलातील प्रवेशाच्या संधी उपलब्ध होत असतात.

सैन्यात शॉर्ट सर्व्हीस कमीशनद्वारे परीक्षा घेतल्या जाणार असून तांत्रीक पदासाठी बी.ई./बी.टेक. किंवा एम.एस.स्सी कम्प्युटर झालेले १९ ते २७ वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. अतांत्रिक पदासाठी पदवी पूर्ण केलेल्या १९ ते २५ वयोगटातील उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले जातात.

इंडीयन मिलीट्री अकॅडमीद्वारे अतांत्रिक पदासाठी पदवी पूर्ण केलेले १९ ते २४ वय वर्षे असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. याचबरोबर बारावी नंतर तांत्रिक पदासाठी भौतिक, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयासह १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

सोल्जर जनरल ड्युटीसाठी ३३%सह दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, सोल्जर नर्सींग असीस्टंट/टेक्नीकल पदासाठी १२ उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. १० वी उत्तीर्ण किंवा ८ वीसह आयटीआय पूर्ण केलेला उमेदवार सोल्जर ट्रेड्समॅन या पदासाठी तर, १२ वी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड कॅटरींग केलेले उमेदवार नायब सुभेदार (कॅटरींग जेसीओ) या पदासाठी अर्ज करून आर्मीमध्ये प्रवेश करू शकतात.

याचबरोबर एमएस्सी, एमसीए किंवा बी.ए.(बी.एड)/बी.एस्सी./बी.सी.ए.झालेले उमेदवार सरळ परिक्षेद्वारे हवालदार या पदासाठी अर्ज करू शकतात.

महिलांसाठी संधी
भारतीय सेनेत मध्ये बाराशेहून अधिक महिला अधिकारी आहेत. या पदासाठी प्रवेश घेण्यासाठी पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर महाविद्यालय स्तरावर एनएसीसी पूर्ण झालेल्या महिला उमेदवारांसाठी सेनादलात प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. मिल्ट्री नर्सीग सर्व्हीसेसद्वारेही बी.एस.सी आणि एम.एस.सी. झालेले उमेदवार सेनादलात प्रवेश घेऊ शकतात.

शस्त्रसंधी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील उमेदवारांना या क्षेत्रात करियर करण्याची संधी प्राप्त होते. जगातील एका बलशाली सेनादलाचा भाग होण्याची आणि कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी या क्षेत्रातून मिळू शकते.

अधिक माहितीसाठी http://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळास भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here