अग्निशमन दलात उप-अधिकारी पदाची संधी

0

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची स्थापना सन १९५६ मध्ये रामपूर, उत्तरप्रदेश येथे करण्यात आली. त्यानंतर हे महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले. निवासी महाविद्यालय असल्याने येथे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जवळच २०० प्रशिक्षणार्थींसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सुरुवातीस एकाच अभ्यासक्रमाने सुरु झालेल्या या महाविद्यालयाने पाठ्यक्रमात वाढ करत व्यावयायिक दृष्टीकोनातून अग्निशमन आणि बचाव कार्य प्रशिक्षण सुरु करण्यात आले. या महाविद्यालयास पदविका आणि उच्च पदविका मध्यम संवर्ग प्रबन्धकारांची नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय लोक सेवा आयोगाने मान्यता दिलेली आहे.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे उप अधिकारी असभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता : दि. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी कोणत्याही शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी पदविका प्राप्त असावी.

वयोमर्यादा : सर्वसाधारण १८ ते २५ वर्षे (इमाव २८, अजा/अज ३० वर्षे)

पात्रता : पुरुष उमेदवारासाठी उंची १६५ से.मी., छाती ८१ ते ८६ से.मी., वजन ५० कि. तर महिला उमेवारांसाठी – उंची १५७ से.मी., वजन ४६ कि.

परीक्षा शुल्क : रु.१००/- रकमेचा धनाकर्ष (डी.डी.) डायरेक्टर एनएफएस्सी, नागपूरयांच्या नावे देय असावा.

उपलब्ध जागा : ४१ वी बॅच ३० जागा, ४२ वी बॅच एक्स्टर्नल उप-अधिकारी कोर्स ३० जागा

अभ्यासक्रम सुरु होण्याचा कालावधी : जानेवारी २०१८ आणि जुलै २०१८

या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दि. १९ सप्टेंबर २०१७ पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. अधिक माहिती http://www.nfscnagpur.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

उमेवारांनी संपूर्ण भरलेला अर्ज दि डायरेक्टर, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, टालकी फिडर रोड, राज नगर, नागपूर ४०० ०३० या पत्त्यावर पाठवावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here