ऑनलाईन नोंदणी १५ सप्टेंबरपर्यंत ; १ ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष कर्जमाफी-सहकारमंत्री

0
 • शेतकऱ्यांना अर्ज भरण्याचे आवाहन
 • बंद असलेली ई-सुविधा केंद्र तत्काळ सुरु करण्याच्या सूचना.
 • कर्जमाफीसाठी वेळेत अर्ज भरण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.
 • आतापर्यंत २२ लाख ४० हजार ९३४ शेतकऱ्यांची नोंदणी
 • १८ लाख ८५ हजार ४५७ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्तछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत राहील. दिनांक १ ऑक्टोबर २०१७ पासून कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

  कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार आदी उपस्थित होते.

  आतापर्यंत म्हणजे २२ ऑगस्ट २०१७ पर्यंत २२ लाख ४० हजार ९४३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तर १८ लाख ८५ हजार ४५७ शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहितीही श्री. देशमुख यांनी दिली.

  यावेळी कर्जमाफी अंमलबजावणीसंदर्भात येत असलेल्या अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत संबंधित ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तत्काळ सुरु करावेत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. राज्यातील सर्व संबंधित शेतकऱ्यांनी दि. १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत जवळच्या ई -सुविधा केंद्रांवर जावून कर्जमाफीचे अर्ज भरावेत, असे आवाहन सहकार मंत्री श्री. देशमुख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here