भीषण आगीत एकाचा होरपळून मृत्यु

0

पालघर -योगेश चांदेकर

पालघर-डहाणूतालुक्यातील कासा मधील दुमजली विशाल ट्रेडर्स या मॉल आणि रहिवाशी इमारतीला 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती यामधे एकूण ,,दहा लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश  आले मात्र त्यात  एक जणाचा होरपळून मृत्यु झाला आहे आग नियंत्रणात आण्यासाठी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या आणि इतर खाजगी तीन टँकरनी मदत घेण्यात आली तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली जिल्ह्यात आगिचे सत्र सुरुच असून काही दिवसापूर्वी तारापुर औद्योगिक वसाहतित लागलेल्या भीषण आगीत 3 जणांचे मृत्यु झाले अस्तानाची घटना ताज़ी असतानाच डहाणू तालुक्यातील कासा येथे विशाल ट्रेडर्स मॉलला पुन्हा भीषण आग लागल्याने एकाचा मृत्यु झाला आहे.

 

रात्री तीनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप अस्पस्ट आहे या भीषण आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालं आहे ,मुख्य बाजारपेठे मध्ये हा मॉल असल्याने दुसऱ्या दुकानांना आगीची झळ पोचू नये म्हणून विशेष काळजी स्थानिक पोलिस,महसूल यंत्रणा व अग्नीशमन दलाने घेतली  होती अथक प्रयत्न करून सात तासा नंतर आग आटोक्यात आली  विशाल ट्रेडर्स आणि विराणी मॉल ट्रेडर्स मॉलचे मालक सलीम विराणी आणि बरखत विराणी हे असून यात त्यांचा भाऊ अजीज वजीर विराणी याचा होरपळून मृत्यू झाला आहे दरम्यान या आगीच्या भीषण तांडवानंतर संपूर्ण कासा गाव हादरले होते मोठी दुर्घटना घडू नए याकरिता प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here