ओबीसी जनक्रांती परिषदेची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक बारामती येथे संपन्न

ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केले समाज बांधवांना मार्गदर्शन

0

पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख लोकांची बैठक बारामती पुणे येथे संपन्न झाली. त्यावेळी पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, कोल्हापुर, अहमदनगर येथुन ओबीसी चळवळीत काम करणारे सर्व पक्षीय समाज कार्यकर्ते उपस्थित होते. ओबीसी जनक्रांती परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिलभाऊ महाजन ह्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.  

बारामती मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याला ओबीसी नेते अनिल महाजन ह्यांनी सर्वप्रथम हार घालून अभिवादन केले मग पुढील बैठकीस सुरुवात झाली.

सीमेवर शहीद झालेले शहीद जवान आणि महाराष्ट्राच्या आत्महत्या करणाऱ्या शेतकरी बांधवाना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी. पुरोगामी समाज प्रबोधनकरणारे आधुनिक कीर्तनकार सत्यपालजी महाराज यांच्यावर झालेला जीवघेण्या  हल्याचा निषेध करण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक ओबीसी परिषदचे सल्लागार विनायकजी यादव यांनी केले. यावेळी ओबीसी जनक्रांती परिषदची भुमिका मान्यवरांना समजावून सांगितली. ओबीसी बहुजन हिताचे अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मान्यवर लोकांनी आपले विचार मांडले. एकुण 15 ठराव एक मताने या बैठकीत पास करण्यात आले आहेत. हे ठराव राज्य सरकारला पाठविण्यात येतील.

ओबीसी हा देशाचा श्वास आहे. ओबीसी वाचला तर देश वाचेल सर्वच राजकीय पक्षांमध्ये गेल्या ४० वर्षापासुन ओबीसी समाज बांधवांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. यासाठी ओबीसी जनक्रांती परिषद लढणार आहे. जेथे जेथे ओबीसींवर अन्याय होईल तिथे त्या अन्याय करणाऱ्या लोकांना धडा शिकवणारच मग तो कोणीही असो. ओबीसी च्या सर्वांगीण सर्वकश विकासासाठी शेवटपर्यंत लढा देणार.

राज्य सरकारने ओबीसीच्या हितासाठी जास्तीत जास्त योजना लागू कराव्यात. ओबीसीच्या हितासाठी जास्तीचा निधी राज्य केंद्र सरकारने जाहीर करावा ओबीसी बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या स्तरांवर आपल्या पक्षामध्ये मंडल आयोग पूर्ण पणे लागू करावा असे ओबीसी नेते अनिल भाऊ महाजन यांनी सांगितले.

 

श्री.के. एम. बागवान यांनी आभार प्रकट केले. शेवटी राष्ट्रगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बैठकीला विजयराव बोरावके,आर बी माळी, शोभा रासकर,विनायकजी यादव,संजय माळी,डॉ.यादव, उमेश पोर्लेकर, शरद ससाणे,वनिता बनकर, बारामती तालुक्यातील ओबीसीबहुजन समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित  होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here