ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा आता आठ लाखांवर!

0

केंद्र सरकारने ओबीसींसाठी क्रिमीलेयर मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवलीय. यापूर्वी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. या निर्णयामुळे मागासवर्गातील 8 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांच्या पाल्यांनाही आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. वाढत्या महागाईमुळे ही क्रिमीलेयर मर्यादा 2 लाखांनी वाढवत असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाखो ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र, हीच क्रिमीलेयरची उत्पन्न मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती.

आरणक्षाचे फायदे सर्व मागासवर्गीयांना न्याय हक्काने मिळावेत, यासाठी ओबीसी प्रवर्गातल्या जातींचं यापुढे उपप्रकारांमध्ये वर्गीकरणही आयोगामार्फत करणार असल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here