न्यूझीलंडमधील मशिदीतील गोळीबारात ६ ठार

0

ख्राईस्टचर्च (वृत्तसंस्था) :

न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदीत झालेल्या अंदाधुंद गोळीबारात सहाजणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. मात्र, सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ज्यावेळी मशिदीत हल्लेखाराने अंदाधुंद गोळीबार केला त्यावेळी मशिदीत प्रार्थनेसाठी लोकांची गर्दी होती. यावेळी बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडूही मशिदीत प्रवेश करणार होते. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ही घटना गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिस येथील परिस्थिती हाताळत असून अद्याप येथील धोका कमी झालेला नाही, असे सांगण्यात आले आहे. हल्लेखोरांना केलेल्या गोळीबारात अनेकजणांचा मृत्य झाला आणि सगळीकडे रक्ताचा सडा पडला, असे एका प्रत्यक्षदर्शीने स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले.

न्यूझीलंडमधील हल्ल्याची घटना अतिशय हिंसक असून हा काळा दिवस आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here