आता सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढणार नाहीत

केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला मागे.

0

नवी दिल्ली :  अनुदानित एलपीजी सिलेंडरमध्ये प्रत्येक महिन्याला चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारनं मागे घेतला आहे. मार्च 2018 पर्यंत सिलेंडरवरील अनुदान पूर्णपणे संपवण्यासाठी  जून 2016 मध्ये सरकारनं एलपीजी गॅसच्या किंमतीत दर महिन्याला 4 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर तेल कंपन्यांनी मागील 17 महिन्यात टप्प्या टप्प्याने 19 वेळा सिलेंडरच्या किंमतीत एकूण 76.50 रुपयांची वाढ केली.

देशात अनुदानित सिलेंडर खरेदी करणारे जवळजवळ 18.11 कोटी एलपीजी ग्राहक  आहेत. 2.66 कोटी लोकांनी आपली गॅसवरील सब्सिडी सोडली आहे. आता सिलेंडरच्या दरात प्रत्येक महिन्याला दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here