नूल येथे जि. प. सदस्य प्रा.अनिता चौगुले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन

0

नूल ( वार्ताहर ) :
जिल्हा परिषद सदस्य प्रा. अनिता चौगुले यांच्या निधीतून १९ लाखांच्या विकासकामांचे उदघाटन रविवारी सकाळी प. पू. भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जि. प. सदस्या प्रा. अनिता चौगुले यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना प्रा. चौगुले यांनी नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये विकासकामे तळागाळात पोहचविण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. या १९ लाखांच्या निधीतून दलित वसाहत, ग्रामपंचायत समोरील रस्ता, अंगणवाडी दुरुस्ती, क वर्ग अंतर्गत रामनाथगिरी मठ सुशोभीकरण अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत.
यावेळी सरपंच स्वाती शिंदे, उपसरपंच कल्लाप्पा देसाई, युवा भाजप अध्यक्ष राकेश शेलार, नागेश चौगुले, डॉ. स्वप्नाली चव्हाण, प्रा. महेश कदम, अजित चव्हाण, अनिल बागेवाडी, सागर सावंत, प्रवीण शिंदे, परशुराम जाधव, मल्लय्या हिरेमठ, अशोक बाळेशगोळ, ग्रामसेवक अमृत देसाई यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here