नूलच्या महिलेचा संकेश्वर येथील अपघातात मृत्यू

0

संकेश्वर कणगला : अम्मणगीनजीक दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला ठार झाली. तर पती आणि दुचाकीस्वार जखमी झाले. गौरव्वा रामाप्पा चितारी (वय ४७, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात रविवारी रात्री अम्मणगी (ता. हुक्केरी) येथे झाला. जखमींवर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी रात्री चितारी दाम्पत्य अम्मणगीत दर्शनाला पायी जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात गौरव्वा यांच्या डोक्याला जबर मर लागला. रामाप्पा हेही गंभीर जखमी झाले. दोघांना गडहिंग्लज येथील खासगी इस्पितळात दाखल केले. गौरव्वा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. रामाप्पा यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुचाकीस्वार प्रवीण भवीमानी (रा. हंदीगुंद) हादेखील जखमी झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here