नूलचे भीमाप्पा मास्तोळी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कौलगेत वह्या वाटप

0

कौलगे गडहिंग्लज : येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
शिक्षण प्रसारक मंडळ नूल या संस्थेचे विद्यमान संचालक श्री. भीमाप्पा मारुती मास्तोळी यांच्या अमृत महोत्सव निमित्त न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वविद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांना ७५ व्या वाढदिवसाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना दिर्धायुष्य लाभो व भावी जीवन आरोग्यदायी जावो म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. एकनाथ देसाई व सर्व शिक्षक यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here