आरोग्याबाबत तडजोड केली नाही. अलबादेवी येथील कार्यक्रमात प्रा. सुनील शिंत्रे यांचे प्रतिपादन

0

प्रतिनिधी चंदगड :
कै. केदारी रेडेकर यांच्या काळापासून अलबादेवी गावाशी जुने ऋणानुबंध असून अलबादेवी गावासह पंचक्रोशी गावासाठी कै. केदारी रेडेकर रुग्णालयाची दारे कातमस्वरूपी खुली आहेत. आरोग्याबाबत रुग्णालयाने कधीही तडजोड केली नाही. असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. अलबादेवी येथे कै. केदारी रेडेकर रुग्णालय व ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती बबनराव देसाई होते.
स्वागत वैभव डांगे यांनी केले. प्रमुख पाहुणे अनिरुद्ध रेडेकर यांनी शासनाच्या विविध योजना रेडेकर हॉस्पिटलमध्ये असून त्या योजना आपल्यापर्यंत पोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून अनेक आजारांवर मोफत शस्त्रक्रिया होत असून याचा लाभ सर्वानी घ्यावा. कॅन्सरतज्ञ डॉ. बसवराज कडलगे यांनी तंबाखूसह वाढती व्यसनाधीनता हे कॅन्सरचे मूळ कारण असून खास करून तरुणांसह सर्वानी व्यसनापासून परावृत्त होण्याची गरज आहे, असे सांगितले. सभापती बबनराव देसाई यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. उत्साळी गावच्या सरपंच सौ. माधुरी सावंत – भोसले, शिरोलीचे जयंतराव देसाई, अलबादेवीतील सरपंच रेखा देवळी, उपसरपंच राजाराम पडले, सुरेश डांगे, ग्रामसेवक अश्विनी कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडिबा घोळसे, श्रीकांत नेवगे, रधुनाथ कोले, यशवंत ढोलासे, विठोबा मोरे, बंडू घोळसे, शशिकांत दोरुगडे, भिकाजी कोले, सुनीता पाडले, रुक्मिणी मोरे, कृष्णा भादवणकर, गुरुनाथ देवळी, वैभव डांगे, निधी कोले, गोविंद कोले, विमल दोरुगडे, परशराम चौकुळकर, दिनकर कोले उपस्थित होते. शिबिराचा लाभ १९८ रुग्णांनी घेतला. आभार मुख्याध्यापिका श्रीमती बागे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here