नितीन गडकरी म्हणाले आरोग्य विभागच आजारी

0

वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन समोरच केले भाष्य

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच आजारी असल्याचे भाष्य केले.  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडल्यामुळे उपस्थितांच्या भोया उंचावल्या. आपल्या आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाही आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचे गडकरी यांनी सांगितले. 

राज्यात नवनवीन आरोग्यासंदर्भात सोयी आणल्या जातात. मात्र गिरीश महाजन साहेब तुमच्या विभागात एकतर मशिन्स येत नाहीत. मशिन्स आलेत तर ऑपरेटर येत नाहीत. ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही व मेंटेनन्स केले तर पैसे नाहीत, अशी अवस्था आहे, असे म्हणत गडकरींनी राज्याच्या आरोग्य विभागाची परिस्थिती त्या विभागाच्या मंत्र्यासमोरच सांगितली. या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. गडकरींच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. केंद्राकडून काय हवी ती मदत घ्या आणि सगळं व्यवस्थित ठेवा, असेही गडकरींनी गिरीश महाजनांना  सांगितले.राज्यातील व देशातील पहिल्या शासकीय स्तरावर स्टेम सेल नोंदणीची मोहीम आणि प्रकल्प नागपुरात सुरु झाला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here