नितीन गडकरी यांनी माफी मागावी- सचिन सावंत

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी

0

प्रतिनिधी – अभयकुमार देशमुख

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नौदल अधिका-यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य आता चांगलच वादात सापडलय. गडकरी यांनी नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम ? असे वक्तव्य केले होते.

या वक्तव्याचा काॅग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत असून त्यांनी नौदलाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलीय.

पुढे बोलताना  मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन न देण्याची भाषा ही सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेली आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणा-या तरंगत्या हॉटेलसाठी नितीन गडकरी एवढे आग्रही का आहेत ?  गडकरींना या तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून भाजपाचा राष्ट्रवाद हा भोंगळ असून तो खाजगी व्यापाऱ्यांकरीता लागू होत नाही असा टोला सावंत यांनी लगावला.

तसेच नौदलाला मुंबईबाहेर काढून, उद्दाम भाषा वापरून, नौदल अधिका-यांचे मानसिक खच्चीकरण करुन केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नितीन गडकरींना पाकिस्तानला मदत करायची आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here