फेसबुक लवकरच एक नवीन फिचर लॉंच करणार आहे. या फिचर्सचं नाव फाइंड वाय-फाय ठेवलं आहे. जगभरामध्ये दोन अब्ज लोक फेसबुक वापरतात. त्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मात्र ही सुविधा फेसबुकने आपल्या आयओएस आणि अँड्रॉईड वापरणा-यांसाठीच देण्याचा निर्णय घेतलाय.मागील वर्षी फेसबुक फाइंड वाय-फाय फिचरसाठी प्रयोग करत होतं. नुकत्याच झालेल्या परिक्षणानंतर फेसबुकने काही निवडलेल्या देशातील आयओएस वापरणा-या लोकांना ही सुविधा दिली होती. मागील वर्षी लॉंच केल्यानंतर हे फिचर फक्त प्रवास करणा-या लोकांसाठी आणि त्या भागातही चांगलंच लाभदायक ठरलं होतं. हे वायफाय हॉटस्पॉट सर्च करण्यामध्ये हे उपयोगी पडतं.तुम्ही जिथे असाल तिथे नेटवर्क चांगलं नसेल तर तुम्ही नवीन कनेक्शन शोधू शकता. यासाठी तुम्ही या फिचरसाठी फेसबुक अँपच्या मोअर स्पॉटला क्लिक करा.ते करताच तुम्हाला फाइंड वाय-फाय मिळून तुम्ही जवळच असणारे नेटवर्क शोधू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here